शिवसेना नेते किरण सामंत यांनी प्रत्यक्षात पाहाळणी केली शेतकऱ्यांनी आपली कैफियत किरण सामंत यांच्यासमोर मांडली.

किरण सामंत यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट
अवकाळी पावसामुळे कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी
अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या भाताचे नुकसान
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याची गरज:- किरण सामंत
आवकळी पावसाचा फटका कोकणात बसला असून खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाने जोर धरला असून भात कापणीला आलेले शेताचे नुकसान झाले असून या उगवलेल्या भातावर अवकाळी पावसाने कहर केल्यानंतर भाताला पुन्हा कोब आल्याचे चित्र राजापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळाले आहे. येथील शेतकऱ्यांची आज शिवसेना नेते किरण सामंत यांनी भेट घेऊन प्रत्यक्षात पाहाळणी केली यावेळेस येथील शेतकऱ्यांनी आपली कैफियत किरण सामंत यांच्यासमोर मांडली.
कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे आमच्या लक्षात असून राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीच आचारसंहितापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे कोकणातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. असे सांगत तात्काळ प्रशासनाने येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करावे अशी ही मागणी यावेळेस किरण सामंत यांच्या माध्यमातून करण्यात आली. आलेल्या शेतकऱ्यांना किरण सामंत यांनी आम्ही तुमच्या सोबत असल्याचा शब्द देत तुमच्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.