एकीकडे दिवाळीत चढला निवडणुकीचा रंग ..मात्र बळीराजा आपल्या शेतीच्या कामात दंग
नवरात्रीचे सणानंतर जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतीचे फार नुकसान झाले. परंतु आता दोन-तीन दिवस पावसाने उसंत घेतल्यामुळे बळीराजा शेतामध्ये भात कापणीसाठी व्यस्त झाला आहे. एकीकडे दिवाळी सण आहे आणि निवडणुकीची धामधूम असताना बळीराजा मात्र शेतामध्ये काम करत आहे. वर्षभर केलेली मेहनत आणि हाता तोंडाशी आलेले पीक घरी आणण्यासाठी बळी राजाची धडपड सुरू आहे. याचवेळी निवडणुकीचे वारे सुद्धा जोरदार सुरू असून ग्रामीण भागात वाडी वस्त्यांवर बैठकांचे सत्र सुरू आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या प्रक्रियेमध्ये प्रत्येक पक्षातील उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते वाडी वस्त्यांवरती जाऊन प्रचार करताना दिसत आहेत.
यावर्षी एकीकडे दिवाळीची धामधूम असताना दिवाळीमध्येच निवडणुकीचे फटाके जोरदार वाजत आहे. परंतु, याचवेळी भारताचा आर्थिक समृद्धीचा कणा समजलेला बळीराजा मात्र या दिवाळीच्या सणांमध्ये आणि निवडणुकीच्या धामधुमीत शेतात घाम गाळत आहे. एकीकडे दिवाळीत चढला निवडणुकीचा रंग आणि बळीराजा मात्र शेतीच्या कामात दंग अशीच परिस्थिती सध्या दिसून येत आहे.
दिवाळीच्या सणातच निवडणुका लागल्याने दिवाळीचे फटाके आणि निवडणुकीच्या प्रचाराचे फटाके सुद्धा दिवाळीमध्ये जोरदारपणे फुटत आहेत. दिवाळी सण सुरू झाला असून शहरात मात्र रंगीबेरंगी आकाश कंदील आणि पणत्यांचा तेजोमय लखलखाट दिसून येत आहे. शहरातील नागरिक दिवाळी साजरी करताना आणि गोडधोड फराळ पदार्थ बनवण्यात व्यस्त आहे.
याच दिवाळीच्या दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि प्रचार यंत्रणा सुद्धा जोरदार सुरू झालेली आहे.
एकीकडे दिवाळीचे फटाके फुटत असून दुसरीकडे उमेदवारांच्या प्रचाराचा जोर सुध्दा वाढत आहे.मात्र, शेतकरी हा शेतात काम करीत असल्याने या निवडणुकीमध्ये कदाचित मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
esocialsmart1