जि.प. शाळा लांजा डाफळेवाडी मुलांच्या परसबागेचा तालुक्यात दुसरा क्रमांक

Kokan live digital news
शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जि.प. शाळा लांजा डाफळेवाडी येथे जून २०२४ पासून अत्यंत उत्साहात राबविण्यात येत आहे. शाळेच्या या अत्यंत नावीन्यपूर्ण व ज्ञानवर्धक प्रात्यक्षिक उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात व आनंदात सहभाग घेतला आणि सृजनशीलतेचा आनंददायी अनुभव विद्यार्थी प्रत्यक्ष घेतला. सदर उपक्रमासाठी शाळेतील इ.१ली ते ७ वीच्या विद्यार्थी, शिक्षक व पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी जोरदार तयारी केली होती. या परसबागेतून विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष सहवास लाभत असून, शेतीची माहिती आणि आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. तसेच यामधून तयार होणाऱ्या पालेभाज्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात वापरल्या असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सकस व पौष्टिक, चवीष्ट आहार मिळत आहे.
शाळे मध्ये परसबाग निर्मिती करताना आधुनिक शेती व यांत्रिक शेती, बैलांचे जोत व ट्रॅक्टर च्या सहाय्याने नांगरणी करून मशागत करून ,अळी तयार करून पाले भाजी, पडवळ,काकडी, टोमॅटो,मिरची,वांयगे,घेवडा, दोडका,कारली, झेंडूची झाडे बियाणे लावण्यात व पेरण्यात आली .
शिक्षणा सोबत मुलांना शेतीची आवड व शेतीविषयक माहिती मिळावी ह्यासाठी हा उपक्रम शाळे मध्ये राबविण्यात आला.
नुकतेच या उपक्रमाचे तालुका स्तरावर परीक्षण करण्यात आले.
यासाठी मा. गटशिक्षणाधिकारी श्री. सावंग साहेब, विस्तार अधिकारी मा.सौ.हिरवे मॅडम, केंद्र प्रमुख मा.श्री.पावसकर सर, श्री. आयरे सर यांनी परसबागेचे शासन निकषांनुसार मूल्यमापन केले.
सदर तालुका स्तरीय मूल्यमापनामध्ये जि.प.पू.प्रा. शाळा लांजा डाफळेवाडीचा तालुक्यात दुसरा क्रमांक आला आहे.
शाळेत परसबाग राबविण्यासाठी मा.
गटशिक्षणाधिकारी श्री. सावंग साहेब, केंद्र प्रमुख श्री. पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अनुजा पांचाळ, नगरसेविका सौ. दुर्वा भाईशेट्ये, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र तुळसणकर, शाळा सुधार समिती सदस्य श्री. प्रसाद भाईशेट्ये, श्री. बाबू पांचाळ, ट्रॅक्टर मालक श्री. कैलास उपशेटे,बैल व नांगरमालक श्री.वसंत कुंभार, श्री. तुकाराम कुंभार, सौ.जान्हवी गांधी,श्री. मोहसीन खतीब,श्री. नरेश कुंभार,श्री. फिरोज नेवरेकर, सौ.मेघना दुबळे, सौ. संजीवनी पांचाळ, सौ.लाइका मुगारी, सौ.संजीवनी पांचाळ, सौ.पूजा शिगम,सौ. मनस्वी समगिस्कर, श्री. प्रभाकर कुंभार,श्री. सुभाष कुंभार,श्री.महेश पांचाळ, श्री. मंगेश पांचाळ,सौ.राजेश्वरी पोटफोडे,श्री.संजय तेरवणकर, श्री. राजेश कांबळे , सौ.नेवरेकर,
मुख्याध्यापक श्री.मनोज रेडिज, शिक्षिका सौ. दिपाली यादव, सौ. दीपा मुळ्ये, सौ. रूक्मिणी कदम-पाटील या सर्वांनी सहभाग घेतला. खास करून जागा मालक श्री. दिलीप तोडकरी ,श्री संजय तोडकरी ,श्री. विलास तोडकरी यांनी परस बागेसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्यामुळे शाळेला परसबाग उपक्रम राबविता आला.याबद्दल श्री. तोडकरी बंधुचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.