निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी शहर पोलीस तर्फे कोकण नगर मध्ये बैठक
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या कोकण नगर पोलीस चौकीमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नव्याने रुजू झालेले रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी कोकण नगर पोलीस चौकी बीट अंतर्गत येणाऱ्या नागरिकांची समन्वय बैठक घेऊन विधानसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शनपर सूचना केल्या.
निवडणुकीच्या काळामध्ये व मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सूव्यवस्था अबाधित राहो यासाठी श्री. शिवरकर यांनी या भागातील नागरिकांना सहकार्य करण्याचे अहवाहन केले. तसेच पोलीस खात्यात मार्फत ही योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
श्री.शिवरकर हे नव्याने पोलीस निरीक्षक म्हणून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये रुजू झाले असल्याने स्थानिकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी.नौसीन काझी भूषण सावंत .वैभव पाटील हर्षराज पाटील .रोशन पालकर* , एलियाज खोपेकर.मन्सूर नावडे खान कोकण नगर बीट अंतर्गत येणारे सर्व पोलीस पाटील, चौकीतील पोलीस अधिकारी, तसेच असंख्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.