दागिने असलेली बॅग परत केल्याबद्दल ओंकार यांचा लांजा पोलीस स्थानकातर्फे सत्कार
कोकण लाइव डिजीटल न्यूज़
१३ ऑक्टोबर रोजी सापूचेतळे येथे बरमारे साटवली यांची बॅग प्रवास करत असताना रस्त्यावर पडलेली होती, या संदर्भात सर्वत्र मेसेज प्रसारित करण्यात आलेला होता, दरम्यान सदरची बॅग ओमकार अनिल खानविलकर, वय 33 धंदा-टुरिस्ट व्यवसाय, राहणार खेडशी नाका रत्नागिरी मुळ रा. बेनी बुद्रुक यांना सदरची बॅग मिळालेली होती व त्यांनीही बॅगेबाबत मेसेज वायरल केलेला होता. सदरची बॅगेमध्ये रोख रक्कम व सोन्याचे दागिने असल्याबाबत बरमारे यांनी सांगितले होते. सदरची बॅग व त्यातील सर्व वस्तू बरमारे यांना परत करण्यात आलेली आहे. ओंकार अनिल खानविलकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल लांजा पोलीस अधिकारी निळकंठ बगळे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.