लांजा तालुक्यातील शिवसेना उबाठा, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसला धक्का देत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

राजापूर लांजा मतदासंघांचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत लांजा तालुक्यातील शिवसेना उबाठा, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसला धक्का देत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी भाजपचे माजी तालुकाप्रमुख, सहकारी क्षेत्रातील आघाडीचे नेतृत्व, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक मुन्ना खामकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत आज प्रवेश केला आहे
महेश उर्फ मुन्ना खामकर यांचा लांजा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे.
तसेच शिवसेना उबाठाच्या लांजा शहर महिला संघटक छाया गांगण यांचाही आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न उर्फ दादा शेट्ये यांचाही शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरीफ नाईक यांचाही शिवसेनेत प्रवेश केला आहे .
खामकर, शेट्ये, छाया गांगण यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला लांजात बळकटी
मिळणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेंच्या शिवसेनेची लांजा-राजापूरमध्ये मोर्चेबांधणी केली जात आहे.
_________________