सहयाद्री व्याघ्र राखीव च्या आंबा वनक्षेत्रात लावण्यात आलेल्या कॅमे-यामध्ये शिकारी कैद

सहयाद्री व्याघ्र राखीव च्या आंबा वनक्षेत्रात लावण्यात आलेल्या कॅमे-यामध्ये शिकारी कैद

kokan live digital news सहयाद्री व्याघ्र राखीव च्या आंबा वनक्षेत्रात लावण्यात आलेल्या कॅमे-यामध्ये दिनांक १३-१२-२०२४ रोजी पहाटे ७.०० च्या सुमारास हातामध्ये बंदूक घेउन शिकारीच्या शोधामध्ये फिरणारा इसम नामे श्री. गोविंद बाळू शिंदे रा.काले पैकी नेलेवाडी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर हा कॅमे-यामध्ये कैद झाला. दिनांक १७-१२- २०२४ रोजी वनरक्षक श्री. रोहिदास पडवळे हे नेमूण दिलेल्या कामानुसार लावण्यात आलेल्या कंमें-पांची तपासणी कामी गेले असता मौजे केले जंगल कक्ष क्रमांक १०२१ मधील कॅमे-यामध्ये वरोल आरोपीचे बंदुकीसह फिरतानाचे ०३ फोटो मिळून आले. सदरची बाब त्यांनी आपले वरीष्ठ यांना कळविलेनुसार पंचासह वनक्षेत्रात कॅमेरा लावलेल्या ठिकाणी जावून कॅमे-याची तपासणी करून मेमरी कार्ड जप्त करण्यात आले, व कार्डमधील आरोपीचे फोटो प्रिंट करण्यात आले.

गोपनीय तपासानुसार आरोपीची ओळख पटल्यामुळे आज दिनांक १८-१२-२०२४ रोजी आरोपीच्या राहते घरी सकाळी ७.०० वाजता चाड टाकून आरोपीस ताब्यात घेउन घरझडती घेतली असता आरोपीच्या ताब्यातून १) काळया रंगाची ट्रक पेट किमत ५०/- रु. २) एअर गन००१ किमत २०००/० रु. ३) मिलोटरो कलरचे जैकेट किंमत ३००/- रु. ४) Sparx कंपनीचे जुने वापरातील सैंडल किंमत १००/-रू. ५) Real Me कंपनीचा मोबाईल Model RMX३७७१ किंमत ८०००/-, दोन सिमकार्ड सह मुददेमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करणेत आला आहे.

मा. सहाय्यक वनसंरक्षक चांदोली श्री. अमित भिसे यांनी आरोपीची समक्ष चौकशी करून जवाव नोंदविला व साक्षीदारांचे तपास टिपण तयार केले, आरोपीला मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शाहूवाडी यांचे न्यायालयात हजर केले असता दोन दिवासांची फरिस्ट कस्टडी देण्यात आली आहे यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील आणखीन आरोपीचा सहभाग असलेचे समोर येत आहे.

गुन्हाचा तपास मा.श्री.एम. रामानुजम सर वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सहयाद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर, मा. श्रीमती स्नेहलता पाटील उपसंचालक चांदोली यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक वनसंरक्षक चांदोली श्री. अमित भिसे यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत, श्री. प्रदिप कोकोतकर वनपरिक्षेत्र अधिकारी (आंबा) हे करत असून तपास कामात ओ. सागर पोवार वनपाल गोलीवणे, श्री. सुरेश चरापले वनपाल उयगिरी, श्रीमती मनिषा देसाई वनपाल निसर्ग पर्यटन आंचा, वनरक्षक श्री. रोहीदास पडवळे, श्री. अरविंद पाटील, श्री. विशाल पाटील, श्री. राजेंद्र बनकर हे मदत करत आहेत.

सहयाद्रो व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी ट्रैप कॅमेरे बसविण्यात आलेले असून नागरीकांनी कोणत्याही कारणास्तव सहयाद्री व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये विना परवाना अपप्रवेश करू नये असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.