बिबट्या कसा पडला विहरीत वाचा पूर्ण बातमी

बिबट्या कसा पडला विहरीत वाचा पूर्ण बातमी

रत्नागिरी कोकण लाइव डिजिटल न्यूज़
 दिनांक 19/12/2024 रोजी मौजे निवळी येथील  मालपवाडी  येथे वसंत देमु मालप् यांचे मालकीचे घर परसवातील कठडा असलेल्या विहिरीत बिबट्या हा वन्य प्राणी पडल्याची माहिती रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमती रसिका सावंत ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी यांनी वनरक्षक जाकादेवी यांना दूरध्वनी वरून कळविण्यात आली. त्यानंतर तात्काळ परिक्षेत्र  वन अधिकारी रत्नागिरी यांना सदरची माहिती देऊन घटनास्थळी तात्काळ पिंजऱ्या सह येऊन पाहणी केली असता सदरची विहीर ही गोल असून विहिरीची लांबी अंदाजे 65 फूट खोल आहे गोलाई 15फूट असून विहिरीमध्ये वन्यप्राणी बिबट्या पाण्यावर पोहत असल्याचे दिसून आले त्याप्रमाणे तात्काळ दोरीच्या साहाय्याने चौफळा विहिरीत सोडून  त्याचा आधार देऊन बिबट्याला सुरक्षित बसण्याची जागा करण्यात आली त्यानंतर विहिरीमध्ये दहा वाजण्याच्या सुमारास पिंजरा सोडला असता साधारण अर्ध्या तासात पिंजऱ्यामध्ये बिबट्याने प्रवेश केला तात्काळ पिजऱ्याचा दरवाजा बंद करून बिबट्याला जेरबंद करण्यातात आले  पशुवैद्यकीय अधिकारी  कसाळकर  यांच्याकडून बिबट्याची तपासणी करून घेऊन सुस्थितीत असलेचे खात्री पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केली सदर बिबट्या हा मादी जातीचा असून अंदाजे तीन वर्षाचा असून तो सुस्थितीत  असल्याची खात्री केली सदर रेस्क्यूची कार्यवाही ही  विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण    श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक  प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कामगिरीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी  परिक्षेत्र वन अधिकारी फिरते पथक  राजेंद्र पाटील परिक्षेत्र वन अधिकारी  राजापूर मंगेश पाटील. लेखापाल रत्नागिरी तानाजी पाटील, न्हा.सी गावडे वनपाल पाली प्रभू साबणे वनरक्षक रत्नागिरी श्रीमती शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी तसेच गावच्या पोलीस पाटील पवार , पोलीस अधिकारी रुपेश भिसे , लक्ष्मण कोकरे अनिकेत मोरे, महेश धोत्रे,तसेच गावातील सगळे ग्रामस्थ उपस्थित होते सदरचा बिबट्या हा सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.