कोकण बँकेच्या बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर

कोकण बँकेच्या बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर आले असता रत्नागिरीतील केटीव्हीचे संचालक रज्जाक काझी, कोकण 24 तास चे अल्लीमिया काझी , शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच फरीदा काझी यांनी स्वागत करून सत्कार केला 
        यावेळी बँकेचे चेअरमन आसिफ दादन, व्हाईस चेअरमन अजगर डबीर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन अल्ताफ काझी, क्रेडिट कमिटी चेअरमन बशीर मुर्तुझा बँकेची सीईओ अकबर कोंडकरी, संचालक दिलीप मुजावर, समीर मुल्ला, क्रेडिट डिपार्टमेंट अधिकारी गफूर बलबले यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते
    यावेळी बँकेचे चेअरमन नी बँकेची थोडक्यात माहिती देताना सांगितले की 2024- 25 या आर्थिक वर्षात बँकेने ११ कोटीचा नफा कमवला आहे परंतु यापुढे 2025- 26 साठी हा नफा दुपटीने  करण्याचे ध्येय केले आहे बँकेचे भागधारक, ग्राहक, कर्मचारी, अधिकारी संचालक मंडळ यांच्या त्यांच्या सहकार्यामुळेच बँक अधिक प्रगती पथावर चालली आहे