हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत पूर्ण माहिती कोकण लाईव्ह तर्फे

हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत पूर्ण माहिती कोकण लाईव्ह तर्फे

हिवाळ्यामध्ये तब्येतीबरोबरच त्वचेची काळजी घेणही तितकंच गरजेचं असतं. कारण थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. तसंच थंड हवेमुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे त्वचा रुक्ष व निर्जीव वाटू लागत


या ऋतूत आपल्या त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. आता हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. अशा परिस्थितीत जाणून घ्यायला हवं की, विंटरमध्ये नक्की त्वचेची काळजी कशी घ्यावी.

विंटर स्किन केअर टिप्स
थंडीच्या मौसमात स्किन (skin) खूपच कोरडी आणि निर्जीव होते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी विविध प्रकारे घ्यावी लागते. या हिवाळ्यात तुम्हीही आपल्या स्किनसाठी हे खास स्किन केअर टिप्स (skin care tips) फॉलो करा.

कोमट पाणी (Lukewarm Water)
थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणं साहजिक आहे. पण प्रयत्न करा की, तुम्ही जास्त वेळ गरम पाण्याच्या संपर्कात राहणार नाही. शक्य असल्यास थंड पाण्याने चेहरा आणि हात धुवा किंवा गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा (lukewarm water) वापर करावा. कोमट पाणी तुमच्या त्वचेतील आर्द्रता कायम ठेवतं आणि एसेंशियल ऑयल (essential oil) सुद्धा कायम ठेवतं.

मॉईश्चराईजर आहे आवश्यक (Moisturizer)
थंडीच्या दिवसात आपल्या चेहऱ्याला मॉईश्चराईज (moisturize) करणं खूपच आवश्यक असतं. त्यामुळे हलक्या हाताने ओल्या चेहऱ्यावर मॉईश्चराईजर (moisturizer) लावा. ज्यामुळे मॉइश्चर अनेक तास चेहऱ्यावर लॉक राहील. तुमच्या हातानांही मॉईश्चराईजर लावायला विसरू नका. आंघोळ केल्यानंतर लगेच शरीराला मॉईश्चराईजर नक्की लावा. शरीराचा जो भाग मोकळ्या हवेच्या संपर्कात येत असेल तिथे मॉईश्चराईजर नक्की लावा.

एक्सफोलिएशनने पडेल फरक (Exfoliate)
हिवाळ्यात चेहऱ्यावरील डेड सेल्स (dead cells) हटवणं आवश्यक असतं. डेड सेल्स (dead cells) वाढल्याने तुमच्या चेहऱ्याला आवश्यक तेवढी आर्द्रता मिळत नाही. त्यामुळे मॉईश्चराईजर लावण्याआधी त्वचेला एक्सफॉलिएट  (exfoliate) करायला विसरू नका. थंडीमध्ये केमिकल पील ट्रीटमेंट (chemical peel treatment) सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता.

जास्त पाणी प्या (Drink Plently of Water)
थंडीत साधारणतः आपलं पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं आणि चहा आणि कॉफीचं सेवन जास्त होतं. आपले स्किन सेल्स (skin cells) ना हायड्रेटेड (hydrated) ठेवण्यासाठी आवश्यक आहे की, आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवणं. जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. चेहराही तजेलदार राहतो. त्यामुळे दिवसभरात किमान 3 लीटर पाणी पिण्याचं टार्गेट सेट करा.

डाएट चार्टमध्ये करा बदल (Change in Diet)
थंडीच्या दिवसात हिरव्यागार पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. तसंच गाजर आणि मटारसारख्या भाज्याही मिळतात. त्यामुळे त्याच्या रोजच्या डाएट (diet) मध्ये डाळ आणि फळांसोबतच मेथी, सोया मेथी, गाजर, आणि पालक यासारख्या भाज्यांचं प्रमाण वाढवा. मूठभर बदाम आणि अक्रोडसुद्धा तुमच्या डाएटमध्ये सामील करा.

फेसमास्कचा करा वापर (Use Face Mask)
आठवड्यातून दोनदा जेल (gel) किंवा क्रीम (cream) बेस्ड फेस मास्क (face mask) चा प्रयोग केल्यास तुमच्या चेहऱ्याचं मॉईश्चर कायम राहील आणि टॉक्सिन (toxin) बाहरे पडण्यासही मदत होईल. थंडीच्या दिवसात त्वचा जास्त कोमल आणि तजेलदार दिसण्यासाठी दही आणि साखरेचं मिश्रणही तुम्ही लावू शकता. कोरड्या त्वचेसाठी दूध एक उत्तम टॉनिक म्हणून काम करतं. तुम्ही हवं असल्यास कोणत्याही फेसपॅकमध्ये दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता किंवा फक्त दूधानेही चेहऱ्यावर मसाज करू शकता.

विसरू नका सनस्क्रीन (Use Sunscreen)
उन्हाळ्याच्या दिवसता सनस्क्रीन (sunscreen) वापरणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच थंडीच्या दिवसातही. बरेचदा आपण थंडीत सनस्क्रिन लावायला विसरतो. पण हे चुकीचं आहे. थंडीच्या दिवसातही आवर्जून सनस्क्रिन वापराच. यामुळे सूर्याच्या अल्ट्राव्हॉयलेट (ultraviolet) किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण होईल आणि त्वचेची न्यूट्रीशन लेव्हलसुद्धा संतुलित राहील.

गुड नाईट विथ क्रीम (Night Cream)
थंडीच्या दिवसात झोपण्याआधी चेहऱ्यावर नाईट क्रीम (night cream) जरूर लावा. स्किनला रिपेअर (repair) करण्यासाठी एक चांगल्या क्वालिटीचं कोल्ड क्रीमसुद्धा जरूर लावा. पिस्त्याची गणतीसुद्धा एक चांगलं मॉईश्चराईजर म्हणून केली जाते.

ओठांची विशेष काळजी (Take Care of Your Lips)
कोरडी त्वचा असणाऱ्यांना ओठ फुटण्याची समस्या तीव्रतेने जाणवते. त्यामुळे तुमची त्वचा जर कोरडी असल्यास शक्यतो थंडीत लिप ग्लॉस किंवा मॅट लिपस्टीक वापरणं टाळा. कारण यामुळे ओठ जास्त कोरडे होतात. त्यापेक्षा व्हॅसलीन जेली किंवा लिपबामचा वापर करावा.
डिहायड्रेशन टाळण्यासाठी (Keep Your Skin Hydrated)
आपण नेहमी ऐकतो की, भरपूर पाणी प्यायला हवं. हेच थंडीतही महत्त्वाचं आहे. त्यासोबत ताज्या फळांचे ज्यूस प्या. तसंच पालेभाज्या आणि टॉमेटो, ब्रोकोली, कलिंगडसारखी फळं खा. ज्यांच्यात भरपूर वॉटर कंटेट असतं. अल्कोहोल आणि खारट-तळलेलं फूड टाळा. कारण यामुळे शरीर जास्त डिहायड्रेट होतं आणि ज्यामुळे त्वचा जास्त ड्राय होते.

मुस्कान रुबिन मुजावर #vishee86