लांजा पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे काम निकृष्ट की उत्तम असाच सवाल लांजा वासियांना पडला आहे

लांजा पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे काम निकृष्ट की उत्तम असाच सवाल लांजा वासियांना पडला आहे
पाहणी करत असताना याप्रसंगी डॉक्टर सचिन कोरे यांच्यासह लांजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष मेहत्रे जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता आर बी मठपती शाखा अभियंता हेमंत शिवपुरे आरसीसी डिझायनर मंदार आंबेकर यांच्यासह ठेकेदार गणी हसन मुलानी आणि असिम मुलांनी हे उपस्थित दिसत आहेत

Kokan Live Digital News:

लांजा पंचायत समितीच्या नूतन इमारत बांधकामाला रायगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी चे शासन नियुक्त तंत्रज्ञ आणि आरसीसी डिझायनर तज्ञ डॉक्टर सचिन पोरे यांनी शुक्रवारी 21 जानेवारीला भेट देऊन कामाची पाहणी केली सदरचे काम योग्य आणि उत्कृष्ट असल्याचा त्यांनी निर्वाळा केलाय मात्र 

लांजा पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे काम हे बोगस व निकृष्ट दर्जाचे आहे असा आरोप लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनंत जाधव यांनी केला होता याबाबतची तक्रार जिल्हा परिषद व संबंधित मंत्रालयाकडे देखील करण्यात आली होती शुक्रवारी लांजा येथे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला भेट देऊन सदर कामाची पाहणी केली गेली मात्र आनंद जाधव यांचा आरोप असा आहे की या प्रकरणात त्यांना कुठेही न घेता पाहणी करण्यात आली त्यामुळे त्यांनी संबंधित डिझायनर तज्ञ सचिन पोरे यांना संपर्क करून निकृष्ट कामाचे व्हिडिओ फोटो पाठवले आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा सचिन पोरे याठिकाणी भेट देणार असल्याचं अनंत जाधव यांनी पत्रकारांना सांगितले