शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवींचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
अनपेक्षितपणे शिवसेनेमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवी यांनी आपला शनिवार दि.९ जूलै रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धावजी ठाकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी व शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवी यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघ व रत्नागिरी तालुक्याच्या शिवसेना कार्यकारणीच्यावतीने मंदिरात मध्ये अभिषेक करण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने
सकाळी ०८.३०वा.भैरीमंदिर खालचीआळी,रत्नागिरी
सकाळी ११.००वा. धूतपापेश्वर मंदिर,राजापूर,
दुपारी १.३०वा.पोलतेश्वर मंदिर,लांजा यांच्यावतीने मंदिरामध्ये अभिषेक संपन्न होणार असून
सायंकाळी सहा नंतर आमदार डॉ.राजन साळवी निवासस्थानी असणार आहेत.
अशी माहिती राजापूर, लांजा, साखरपा व रत्नागिरी तालुका शिवसेनेच्यावतीने देण्यात आली आहे.
Bni salah transfer