आमदार डॉ.राजन साळवीच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्रांसोबत बैठक
दळण-वळणाच्या दृष्टीेन उपयुक्त व पर्यायी मार्ग असलेल्या राजापूर विधानसभा मतदार संघातील भांबेड,जि.रत्नागिर-गावडी, जि.कोल्हापूर व देवडे-भोवडे जि.रत्नागिरी-विशालगड, जि.कोल्हापूर व राजापूर तालुक्यातील मौजे काजिर्डा ते पडसाळी घाट रस्ता या तीन जिल्हे जोडणारा रस्ता होणे संदर्भात आमदार डॉ.राजन साळवीच्या निवेदना प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना.अशोक चव्हाण यांनी शुक्रवार दिनांक ०७ जानेवारी रोजी बैठकीचे नियोजन केले आहे.
आमदार डॉ.राजन साळवी यांनी लांजा तालुक्यातील भांबेड कोळेवाडी ग्रामा ६७ व मौजे मांजरे ते गावडी, जि.कोल्हापूर ग्रामा ४७ या दोन रस्त्यामधील सुमारे ८ कि.मी. अंतर घाट फोडून रस्त्याला जोडल्यास वाहतूकीतील अंतर कमी होऊन दळण वळणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल तसेच संगेमश्वर तालुक्यातील देवडे भोवडे ते विशालगड या मार्गावर नव्याने रस्ता तयार केल्या भविष्यात पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन गैरसोय टाळता येईल यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. नाम.अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. तसेच अनेक वर्षे रेंगाळलेल्या राजापूर तालुका ते कोल्हापुर यांना जोडणाऱ्या काजिर्डा, पडसाळी घाटरस्त्याचे खोदकाम करुन पक्क्या स्वरुपात रस्ता तयार करण्यात यावा त्यासाठी शासकीय पातळीवरुन निधी उपलब्ध व्हावा यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात प्रयत्न करावेत अशी मागणी उप विभागप्रमुख प्रदीप चंदूरकर व काजिर्डा गावचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शिंदे यांनी आमदार राजन साळवींकडे निवेदनाव्दारे केली होती.
सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना.अशोक चव्हाण यांनीही हि समस्या गांभीर्याने घेऊन आमदार डॉ.राजन साळवी यांच्या विनंतीला मन देत बैठक घेण्याचे मान्य केले असून शुक्रवार दिनांक ०७ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वा. सार्वजनिक मंत्री महोदयांच्या दालनामध्ये संबंधित अधिकार्यांन समवेत बैठक होणार आहे.
Bni salah transfer