कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे गणपतीपुळे मधे पर्यटकांचा अल्प प्रतिसाथ
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे थर्टीफर्स्ट व 2022 या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होईल, असा अंदाज स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात होता. मात्र शासनाने थर्टीफर्स्टच्या व ओमीक्रोन या कोरोना विषाणूच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केल्यानंतर गणपतीपुळे पर्यटन स्थळ शुक्रवारी थर्टी फर्स्टच्या निमित्ताने अतिशय तुरळक गर्दीच्या स्वरूपात दिसून येत आहे. तर येथे आलेल्या बऱ्याच पर्यटकांनी केवळ देवदर्शनाचा लाभ घेऊन परतीचा मार्ग धरल्याचे चित्र दिसून आले.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात दरवर्षी थर्टीफर्स्ट व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी पसंती मिळते. परंतु गेल्या दीड वर्षात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरूच असल्याने या तीर्थक्षेत्रात पर्यटकांची संख्या कमी प्रमाणात दिसून येत आहे त्यातच पर्यटन क्षेत्राला शासनाने परवानगी दिल्यानंतर या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल असे चित्र निर्माण झाले होते. त्यातील दिवाळी पर्यटनाचा हंगाम अतिशय चांगल्या प्रकारचा गेल्यानंतर नाताळ पर्यटन हंगामात ही त्याच प्रमाणात पर्यटन व्यावसायाला गती मिळेल असा आशावाद येथील सर्वच लहान मोठ्या पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला होता. मात्र थर्टीफर्स्ट व नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांच्या गर्दीचा फायदा स्थानिक व्यवसायिकांना होणार असे चित्र दिसत असतानाच शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे निश्चितच सर्व ठिकाणच्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे त्याचाच परिणाम म्हणून गणपतीपुळेसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळीही आज शुक्रवारी कमी प्रमाणात गर्दी दिसून आल्याने स्थानिक व्यवसायिकांची पूर्णता निराशा झाली आहे. त्यातच थर्टी फर्स्टच्या निमित्ताने व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जल्लोषासाठी येणाऱ्या पर्यटकांवर देखील आता मोठे निर्बंध लागू झाल्याने पर्यटकांनी देखील मोठी नाराजी व्यक्त केल्याचे चित्र दिसून येत आहे.
Bni salah transfer