लांजा मधील नागरिक आक्रमक शहर विकास आराखड्याबाबत अनेक नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण
कोकण लाइव डिजीटल न्यूज़
लांजा नगरपंचायतीच्या वतीने शहरामध्ये सध्या शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे या आराखड्याबाबत अनेक नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.त्या साठी आज लांजा ग्रामस्थान च्या वतीने चव्हाटा मंदिर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते
नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्याचा मसुदा पाहिला असता यामध्ये असंख्य त्रुटी आहेत एवढेच नव्हे तर शहरातील नागरिकांचे फार मोठे नुकसान होणार असल्याचे यामधून प्रकर्षाने दिसत आहे.या संदर्भात आमदार किरण सामंत, येथील खासदार नारायण राणे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत निवेदन देऊन सदर विकास आराखड्याला तातडीने स्थगिती मिळावी अशी मागणी आम्ही केलेली आहे.असे या वेळी सांगण्यात आले
शहर विकास आराखड्याला स्थगिती मिळण्यासाठी लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत अशाच वेळी दिनांक 27 जुलै रोजी रत्नागिरी येथे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टी समजून घेतल्याआहेत त्यांच्याही लक्षात आलेले आहे सदरचा विकास आराखडा हा चुकीच्या पद्धतीने बनविलेला आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासित केले आहे की सदर विकास आराखड्या बाबत आपण लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विकास आराखड्याला स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.असे सांगितले
लांजा कुवे बचाव समिती ही शहर विकास आराखड्यातील असलेल्या असंख्य त्रुटी बाबत सर्व स्तरावर न्याय मागण्याचा प्रयत्न करीत आहोत कारण या शहर विकासा आराखड्यामुळे शहरातील नागरिकांचे फार मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे या विकास आराखड्याला जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा निर्णय सर्व नागरिकांनी या ठिकाणी घेतलेला आहे.
आम्ही या विकासाला आराखड्याला का विरोध करत आहोत याची ठळक करणे....
१) लांजा कुवे शहरांमध्ये अनेक वाड्या वस्त्या दाटीवाटीच्या असून यामध्ये दाखविण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांमुळे भविष्यात अनेकांची घरे तुटली जाणार आहेत.
२) जमीन वापराचा नशामधे वस्तुस्थिती दाखविली नसल्याने नियोजित आराखड्यामध्ये दाखविण्यात आलेले रस्ते घरावरून दाखविले गेले आहेत
३) रिंग रोडच्या नावाखाली नव्याने काढण्यात आलेला १८मीटरचा रस्ता वस्ती बाहेरून नेणे गरजेचे होते परंतु असे न करता वाड्या वस्त्यातून नेण्यात आलेला असल्याने यामध्ये देखील घरांचे नुकसान होणार आहे.
४) शहरातील मंदिरे मस्जिद आणि दर्गा यांच्या जागा बाधित होत आहेत
५) कमर्शियल भाग ग्रीन झोन मध्ये टाकण्यात आलेले आहेत
६) मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या बाजारपेठेतील अनेक दुकाने व्यावसायिक झोन मधून वगळण्यात आलेली आहेत
७) महामार्गालगतचा भाग ग्रीन झोन मध्ये समावेश केल्याने भविष्यात या भागाची व्यापारी डेव्हलपमेंट थांबणार आहे.
८) रहिवाशी भागाच्या शेजारीच नो डेव्हलपमेंट झोन टाकल्याने नागरी वस्तीचे विस्तारीकरण करता येणार नाही
९) नो डेव्हलपमेंट झोन आणि ग्रीन झोन प्रमाणापेक्षा अधिक टक्केवारी मध्ये टाकण्यात आल्याने भविष्यात शहराचे विस्तारीकरण होण्यास अडचण निर्माण होणार आहे
१०) अनेक ठिकाणी रस्ते घरावरून दाखवण्यात आलेले आहेत
११) नगरपंचायतीच्या क्षेत्रातील एकूण लोकसंख्या आणि भविष्यात होणारी वाढ त्यासाठी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, शिक्षण, आरोग्य सुविधा, क्रीडांगणे सांस्कृतिक केंद्रे आणि नैसर्गिक आपत्ती बाबत नियोजन करण्यात आलेले नाही.
१२) संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊस ला रस्ता दाखवण्यात आलेला नाही
१३) शासकीय स्मशानभूमी (कब्रस्तान) मधून रस्ता दाखविण्यात आलेला आहे
१४) अनेक ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले रस्ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि नव्याने दाखविण्यात आलेले आहेत
१५) कुवे येथे रहिवासी घरांवर ग्रीन झोन दाखविण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे लांजा नगरपंचायतीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये असंख्य त्रुटी असल्याने भविष्यात शहराचा विकास योग्य पद्धतीने करता येणार नाही एवढेच नव्हे तर वाडीवस्तीतून दाखवण्यात आलेल्या रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांची घरे तुटणार असल्याने विकास आराखड्याबाबत लांजा, कुवे, आगरगाव, धुंदरे परिसरासह शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे या विरोधात लांजा नगरपंचायतीकडे सुमारे १५०० नागरिकांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत.
शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या टंडन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वस्तुस्थितीची पाहणी न करता फक्त उपलब्ध कागदपत्राच्या आधारावर ऑफिसमध्ये बसून विकास आराखडा तयार केलेला असल्याने या विकास आराखड्याला तातडीने स्थगिती मिळावी ही एकमेव मागणी आमच्या नागरिकांची आहे बचाव समिती कडून सांगण्यात आले
esocialsmart1