लांजा विभागात प्रचारासाठी घरोघरी कार्यकर्त्यांची धूम

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील ही लढत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे २३ नोव्हेंबर रोजी दाखवून देईलच. परंतु सध्या या मतदारसंघात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) गट व आरपीआय या महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे. महायुतीचे कार्यकर्ते एकजुटीने प्रचारात गुंतले असल्याचे चित्र आहे
कार्यकर्ते हीच नेत्याची ताकद असते, याचाच प्रत्यय लांजा-राजापूर मध्ये दिसून येत आहे. आपल्या नेत्याचे कर्तृत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत, तालुक्यातील ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत तसेच प्रत्येक समाज घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्ते करत असतात. निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराला शेवटच्या घटकांपर्यंत अर्थात मतदारापर्यंत पोहोचणं शक्य नसते, हेच काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होते. जसा निवडणुकीचा अंतिम दिवस एक-एक दिवस उजाडून जवळ येत आहे. तसा प्रचारातही रंग सध्या चढत आहे.