लांजाच्या माजी नगराध्यक्षा शिंदे गट (शिवसेना) मधे शामिल

लांजाच्या माजी नगराध्यक्षा शिंदे गट (शिवसेना) मधे शामिल

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

लांजा माजी नगराध्यक्ष संपदा वाघदरे यांच्यासह त्यांचे पती राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी योगेश वाघदरे व अन्य पदाधिकारी यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे रत्न सिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश तालुक्यात सुरू आहेत त्याचप्रमाणे लांजा येथे झालेल्या कार्यक्रमात किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिंदे गट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे

 

यामध्ये लांजा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष संपदा योगेश वाघधरे तसेच त्यांचे पती योगेश वाघधरे विष्णू वाघधरे नंदादीप वाघधरे तुषार लांजेकर करण वाघधरे अक्षय वाघधरे स्वदेश वाघधरे पांडुरंग साळुंखे (उपसरपंच खेळवली) संदेश वाघधरे आरती वाघदरे माजी नगरसेविका स्नेहल वाघधरे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिता कौचे तसेच प्रशांत वाघधरे अरुण वाघधरे सुभाष गुरव पल्लवी वाघधरे शोभना वागदरे सावित्री वागदरे रोहिणी वाघदरे प्रशांत वाघदरे यांनी शिंदे गट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत देखील करण्यात आले. यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख राजू कुरूप, तालुका अध्यक्ष गुरुप्रसाद देसाई व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते