रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे क्रिकेट मैदानाचे पाहणी

रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे क्रिकेट मैदानाचे पाहणी

रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे क्रिकेट मैदानाचे पाहणी करण्यासाठी खास मुंबईहून मंगेश अदात्रो व नदीम मेमन हे नुकतेच आले होते. मंगेश अदात्रो व नदीम मेमन हे पिच क्युरेटर आहेत. त्यांनी मुंबईतील वानखडे स्टेडियम, डी. वाय. पाटील स्टेडियम, बी.के.सी. स्टेडियमवर खेळपट्टी उभारली आहेत. काही दिवसांपूर्वी मा. ना. उदय सामंत, नगराध्यक्ष बंड्या साळवी, कार्याध्यक्ष बिपिन बंदरकर व असो.चे सर्व पदाधिकारी यांनी रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमींना उत्कृष्ट क्रिकेट मैदान बांधून देतो असे आश्वासन दिले होते. ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नाने हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे. या वेळी मंगेश अदात्रो व नदीम मेमन यांच्या बरोबर उपाध्यक्ष सईद मुकादम, बाळू साळवी, सचिव सुरेश जैन व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.