अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पच्या १८ सुविधां बाबत आमदार किरण सामंत यांनी घेतली आढावा बैठक

अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पच्या १८ सुविधां बाबत आमदार किरण सामंत यांनी घेतली आढावा बैठक

kokan live digital news

अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पच्या १८ सुविधां बाबत आमदार किरण सामंत यांनी घेतली आढावा बैठक

अर्जुना प्रकल्प बाधित असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेज मिळण्यासाठी घेणार पुनर्वसनमंत्र्यांची भेट*

प्रकल्पग्रस्तांच्या छोट्या-मोठ्या समस्या तसेच दाखल्या संदर्भात समस्या सोडवण्यासाठी तात्काळ कॅम्प लावा: आमदार किरण सामतांनी दिले प्रशासनाला आदेश


        लांजा राजापूर साखरपाचे आमदार किरण सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीअर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प बाबत बैठक घेतली.
          अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाचा सिंचन प्रकल्प असून सदर प्रकल्पांतर्गत अर्जुना नदीवर मौजे करत तालुका राजापूर येथे 2012 मध्ये मातेचे धरण बांधण्यात आले. प्रकल्पांतर्गत धरण व कालव्याच्या कामासाठी एकूण 661.273 हेक्टर जमीन आवश्यक असून त्यापैकी 658.477 हेक्टर क्षेत्र संपादित झालेले आहे उर्वरित 2.76 क्षेत्राचे संपादन खाजगी वाटाघाटीचे करणे प्रगतीपथावर आहे. अर्जुनाधानाच्या बांधकामामुळे राजापूर तालुक्यातील करक व पांगरी ही दोन गावे बाधित झाल्याने त्यांचे पुनर्वसन करक१, करक २, पाचल,व पांगरी येरडव संयुक्त असे एकूण चार गावठाणात करण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत नागरी सुविधा बाबतीत आमदार किरण सामंत यांनी आज आढावा घेत येथील ग्रामस्थ अधिकारी यांच्या समवेत बैठक केली. येथील ग्रामस्थांना दिला जाणारा 18 सुविधांबाबत माहिती घेऊन ज्या शिल्लक सुविधा आहेत. त्या तात्काळ ग्रामस्थांना पुरवण्यात याव्या अशा सूचना दिल्या.
यावेळी येथील समस्या लक्षात घेऊन त्या मार्गी लावण्याचे आदेश आमदार किरण सामंत यांनी दिले आहेत. त्याचं प्रमाणे काम करत असताना स्थानिक ग्रामपंचायतना विश्वासात घ्या असे ही सांगितले. येथील जनतेच्या विविध दाखला संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी तात्काळ विशेष कॅम्प लावण्याच्या सूचना जिल्हाधिरी देवेंद्र सिंह यांनी दिले आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह,अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी श्री.बोरकर,प्रांतअधिकारी जीवन देसाई, जलसंधारण अधीक्षक अभियंता श्री,सुर्वे, कार्यकारी अभियंता श्री. विवेक सोनार, तुषार बाबर,गटविकास अधिकारी श्री.जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास चाळके सरपंच
सुरेश ऐनारकर, सरपंच करक 
अमर जाधव, सरपंच पांगरी खुर्द
सुनील जाधव, माजी सरपंच पांगरी खुर्द
संदीप बारसकर, अध्यक्ष पाणी वापर संस्था तळवडे. आदी उपस्थित होते