विकास काय असतो हे मी लांजा- राजापूर मतदार संघात दाखविणार - किरण सामंत
विकास काय असतो हे मी राजापूर मतदारसंघात दाखविणार - महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांचा एल्गार राजापूर येथे हजारो लोकांच्या शक्ती प्रदर्शनाने भरला उमेदवारी अर्ज
किरण सामंत यांचा अर्ज दाखल करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती
राजापूर - लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघात हजारो कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महायुतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचे किरण सामंत यांना उमेदवारी मिळाल्यानंतर किरण सामंत यांनी आज हजारो कार्यकर्ते पदाधिकारी , महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हजारोच्या संख्येत शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. किरण सामंत यांच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली होती. यावेळी महायुती किरण सामंतांच्या भक्कमपणे मागे असल्याचा शब्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असलेली उपस्थिती ही किरण सामंत म्हणजेच महायुतीच्या आमदाराच्या विजयाची नांदी असणार