चार दिवसानंतर काय भूमिका घेणार माजी आमदार बाळ माने
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
भाजपाचे बाळ माने यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि या पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी ब्रेकिंग हाती लागेल म्हणून पत्रकारांनी ही यावेळी गर्दी केली होती परंतु ते मुळात आलेच शर्टावर कमळ हे चिन्ह लावून त्यामुळे नक्की काय भूमिका जाहीर करणार हे जवळजवळ निश्चित झाला होते
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बाळ माने यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही त्यांनी असं म्हटलं की चार दिवसांचा अवधी आहे गुरुवारपर्यंत माझ्या मोबाईल नंबर वर माझ्या सोशल मीडिया अकाउंट वर जनतेने आपला कौल द्यावा मी नक्की काय करावं म्हणजे त्यांनी चेंडू जनतेच्या कोर्टात टाकला आहे जनता ने जर सांगितलं निवडणूक लढवा तर मी निवडणूक लढवू त्यांनी सांगितलं अमुक पक्षातून लढवा तर मी अमुक पक्षातून लढवेन असं त्यांनी सांगितलं म्हणजे एकंदरीतच कोणतीही स्पष्ट भूमिका त्यांनी या पत्रकार परिषदेतून जाहीर केली नाही यांच्याबाबत चार दिवसांचा सस्पेन्स आता राहणार आहे
आता चार दिवसानंतरच हे स्पष्ट होईल की ते नक्की काय भूमिका घेणार आहेत ते भाजपमध्येच राहतील की दुसऱ्या पक्षात जातील की अपक्ष लढवतील हे आता गुरुवार नंतरच आपल्याला सांगता येणार आहे