लांज्यात भक्तिमय वातावरणात पार पडले गणेश विसर्जन

लांज्यात भक्तिमय वातावरणात पार पडले गणेश विसर्जन
लांजा शहरातील ओझर धबधबा येथे विसर्जित करण्यासाठी आणलेल्या गणपती बाप्पांच्या मुर्त्या

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोशात लांजा तालुक्यात 11 हजार 770 घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला 

लांजा शहरातील शेट्येवाडी, गुरववाडी,कोत्रेवाड़ी ,कुरुप वाड़ी ,तेलीवाड़ी, लांजा बाजारपेठ या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढून  गणपती विसर्जन करण्यात आले

 विसर्जनासाठी लांजा वझर धबढबा, लांजा शहरातील आड व बेनी नदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती 

तसेच लांजातील पटेल समाजातर्फे विसर्जनाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये विसर्जन करण्यासाठी आलेल्या लोकांना मदत देखील या पटेल समाजातर्फे करण्यात आली 

लांजा शहरासह तालुक्यातील 11हजार 770 घरगुती गणपती बाप्पांचा विसर्जन करण्यात आले तसेच याबरोबर गौरी गणपती यांचेही विसर्जन या ठिकाणी करण्यात आले. 

शनिवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात हे विसर्जन लांजा व तालुक्यातील इतर ठिकाणी पार पडले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लांजा पोलिसांनी देखील चूक बंदोबस्त ठेवला होता