लांजा राजापूर मतदार संघात विस हजार मताधिक्याने किरण सामंत (भैया शेट) विजयी
रूबीन मुजावर ( कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज)
लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी मध्ये महायुतीचे किरण सामंत यांनी २० हजाराच्या मताधिक्क्याने विजय संपादन केला असून उबाठा सेनेचा आजच्या विधानसभेच्या निकालाने सुफडा साफ झाल्याचे चित्र दिसून आले. शनिवारी सकाळी मतमोजनीला सुरुवात झाल्यापासुन जवळ जवळ सर्वच विभागात आघाडी घेत किरण सामंत यानी विजय मिळवला संपुर्ण राजापूर तालुक्याबरोबर लांजा तालुका आणि साखरपा जिल्हा परिषद गटात किरण सामंत यांचेच वर्चस्व दिसुन आले. प्रत्येक फेरीत किरण सामंत यानीआघाडी मिळवली.
गेली कित्येक वर्ष आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते व रोजगार यांची वानवा असलेल्या या मतदारसंघात महायुतीकडुन निवडणुक तिकिट मिळण्याच्या अगोदरपासुनच किरण सामंत यानी या मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातुन विकास निधी आणला होता
मतदारसंघाचा सर्वांगिण विकास हाच मुद्दा जनतेसमोर ठेवला होता. संपुर्ण मतदार संघाचा निकाल फेरी निहाय हाती येत असताना प्रत्येक फेरीत किरण सामंत याना आघाडी मिळत होती.
गेल्या अनेक निवडणुकान्मध्ये कायम आघाडीवर असणारे राजन साळवी याना मात्र या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर समाधान मानावे लागले. तर महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांची जादुही चालु शकली नाही. मागच्या निवडणुकीत सुमारे ५३ हाजाराची मते घेणारे अविनाश लाड याना या निवडणुकीत मतदारानी नापसंत केले. अविनाश लाड या निवडणुकीत केवळ ७९४५ मतांवर समाधान मानावे लागले तर सर्वच अपक्षाना मतदारानी नाकारल्याचे चित्र आजच्या विधानसभा निवडणुकीत दिसुन आले.