लांजा शहारातील मुजावर वाडी किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवत (शिंदे गट)शिवसेनेत

लांजा शहारातील मुजावर वाडी किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवत (शिंदे गट)शिवसेनेत

राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका लागला आहे. अशातच लांजा शहरातील मुजावरवाडी येथील तरुणांनी किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. किरण सामंत त्यांच्या नेतृत्वाखाली राजापूर लांजा साखरपा मतदार संघातील अनेक तरुण शिवसेनेत प्रवेश करत आहेत. किरण सामंत यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर येथील तरुण वर्ग प्रभावीत झाला आहे. अशातच लांजा शहरातील प्रभाग क्र.९ मधील मुजावरवाडी येथील मुस्लिम तरुणांनी किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेने मध्ये प्रवेश केला. दरम्यान या पक्षप्रवेशावेळी  अब्दुल रहिमान मुजावर, हुसैन मुजावर, रियाज मुजावर, हसन मुजावर, मोसीन मुजावर, अश्कान मुजावर, आजिम (भाई) मुजावर, फिरोज मुजावर, मुअज्जम मुजावर, फैरोज मुजावर, समीर नाईक, मैनुद्दीन मुजावर, अता मुजावर, फैज मुजावर, ताहीर मुजावर, आरसील मुजावर, रेहान मुजावर आदींनी पक्ष प्रवेश केला. दरम्यान यावेळी शिवसेना राजापूर लांजा साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल (राजू) कुरूप, नगरसेवक नंदराज कुरूप, बापू लांजेकर, उद्योजक बाबा भिंगार्डे तसेच विनय गांगण आदी उपस्थित होते.