जलद स्केटिंग स्पर्धेत रैयांश बने याला विजेतेपद …१०वर्षाखालील जलद स्केटिंग स्पर्धेत यश

संदेश सावंत -कोकण लाइव्ह डिजीटल न्यूज़
१०वर्षाखालील जलद स्केटिंग स्पर्धेत भांडूपचा राष्ट्रीय खेळाडू रैयांश बने याने दुहेरी यश मिळवत विजेतेपद पटकाविले. सदरची बास्केटबॉल कोर्ट, सेक्टर 9A, वाशी येथे आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष बने यांचा नातू व उबाठा शिवसेनेचे भांडूपचे उपविभाग प्रमुख पराग बने यांचा सुपुत्र कु. रेयांश पृथा पराग बने याने NBASA SPEED SKATING (Under 10) मध्ये भाग घेत. Long race 10 Laps and Short race 05 Laps या दोन टप्प्यात स्पर्धा विभागली होती. रेयांशने दोन्ही स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले. त्याच्या मेहनतीबद्दल आणि त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. .
यापूर्वी त्याने विविध स्केटिंग स्पर्धैत जूनिअर गटात राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत अनेक विक्रम करत स्पर्धा जिंकून आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
पराग शैक्षणिक संकुल येथे महाराष्ट्रीय शिक्षण संस्था भांडूप यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या..