कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक गिरीश करंदीकर यांचा विशेष गौरव

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
कोकण रेल्वे च्या वतीने ३३ वा स्थापना दिवस वाशी येथील एका सभागृहात साजरा करण्यात आला. अविरत सेवेची २५ वर्षे कोकण रेल्वेने पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.या निमित्ताने कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या २५ वर्षांच्या अखंडीत सेवापूर्ती निमित्त महामंडळातील अधिकारी- कर्मचारी यांचा विशेष सत्कार कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.या वेळी कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीकर, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरूप बागुई यांच्यासह विविधविभागात उल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी जनसंपर्क विभागाला देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सोहळ्यास कोकण रेल्वेच्या सर्व विभागातील विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.