कोकणातील दोन व्यक्तिंकडून मानपाडा पोलिसांनी विक्री करण्यासाठी आणलेले हस्तीचे दोन दात रविवारी संध्याकाळी एमआयडीसी भागात जप्त केले

मुंबई च्या डोंबिवली जवळील २७ गावातील कोकणातील दोन व्यक्तिंकडून मानपाडा पोलिसांनी विक्री करण्यासाठी आणलेले हस्तीचे दोन दात रविवारी संध्याकाळी एमआयडीसी भागात जप्त केले आहेत. या दातांची बाजारातील एकूण किंमत सुमारे १० लाख रूपये आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील घारडा कंपनी परिसरात दोन इसम हस्ती दंत विक्रीसाठी येणार आहेत, अशी गुप्त माहती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून साहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, संपत फडोळ आणि पथकाने एमआयडीसीतील घारडा कंपनी भागात रविवारी संध्याकाळी सापळा लावला होता.