मुंबईत क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.किरणजी सामंत यांच्या हस्ते

चंद्रकांत पंडित क्रिकेट क्लिनिक व मदर स्पोर्ट्स सोशल फाऊंडेशन आयोजित २३ व्या द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर १४ वर्षाखालील मुलांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत निवड क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.किरणजी सामंत, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री. अभय हडप, सह सचिव श्री. दिपक पाटील, कार्यकारी सचिव श्री. सी. एस. नाईक, अपेक्स काऊंसिल मेम्बंर श्री. निलेश भोसले व श्री. कौशिक गोडबोले ह्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पी.जे. हिंदु जिमखाना मरिन लाईन्स, मुंबई येथे पार पडला ह्या उद्घाटन सोहळ्यास मुंबई क्रिकेट असोसिएशन संबंधित विविध क्रिकेट क्लबचे मान्यवर, क्लब सचिव, पदाधिकारी व मान्यवर तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशन १४ वर्षाखालील निवड समिती सदस्य उपस्थित होते.