यशवंत हरियान राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढणार ....

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
लांजा /प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच राजापूर लांजा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे . या विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणून राजापूर तालुक्यामधील केळवली गावचे सुपुत्र मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक यशवंत रामचंद्र हरियान यांनी गावोगावी भेटी देत येत्या विधानसभा निवडणुकीची अपक्ष उमेदवार म्हणून जय्यत तयारी सुरू केली असल्याने सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
लांजा राजापूर येथील विकास कामांसाठी यशवंत रामचंद्र हरियान हे सध्या ॲक्शन मोडवर असल्याने विविध राजकीय पक्षांमध्ये सध्या राजापूर लांजा विधानसभा मतदार संघातील राजकीय वर्तुळातील चर्चेला उधाण आले आहे . या मतदारसंघावरती शिवसेने पाठोपाठ भाजपाने देखील दावा केला आहे , त्यात शिवसेनेकडून संघटनात्मक पातळीवर असंख्य पक्षप्रवेश कार्यक्रम भेटीसाठी यांचा धूमधडाका किरण सामंत यांनी सुरू केला आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी तीन वेळा विजयी झालेले आहेत. या मतदार संघातील पायाभूत सुविधा अजूनही झालेल्या दिसत नसल्याने मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक यशवंत रामचंद्र हरियान यांनी सर्वसामान्यांचा नेता म्हणून आक्रमक भूमिका घेतली असल्याची माहिती त्यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांचा त्यांनी निसटता पराभव करून राजन साळवी पुन्हा एकदा जरी निवडून आले असले तरी यावेळी मात्र दिग्गज उमेदवारांमुळे काटे की टक्कर राजापूर लांजा विधानसभा मतदार संघात होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत .
सध्या राजापूर मतदार संघातून शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आणि रत्नसिंधू योजनेचे सदस्य असलेले किरण उर्फ भैय्या सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदार संघासाठी जोरदार तयारी सुरू केली .असली तरी यशवंत हरियान यांनी आपल्या मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना विविध समाजपयोगी कामांमध्ये मदत करून सर्वसामान्यांची मने जिंकल्याने जनता कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .