गव्यांचा कळप दिवसाढवळ्या रस्त्यावर, वाहनधारकांची उडाली भंबेरी.

सिंधुदुर्ग

गव्यांचा कळप दिवसाढवळ्या रस्त्यावर, वाहनधारकांची उडाली भंबेरी.

https://youtube.com/shorts/Kgi2uTyOXvs?si=Goj5J2nVdwde3jlt

सावंतवाडी-माजगाव रस्त्यावर अचानकपणे गव्या रेड्यांचा कळप रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची भीतीने गाळण उडाली. या महाकाय गव्यांच्या कळपाने अचानकपणे रस्ता ओलांडला. मात्र, यावेळी तेथून जाणारे वाहनचालक सुदैवाने बचावले. सावंतवाडी शहराच्या सिमेवर माजगाव दत्त मंदिर परिसरात गव्यांचा हा कळप रस्त्यातून धावताना पहायला मिळाला. अचानक समोर आलेल्या गव्यांमुळे येथून प्रवास करणाऱ्यांची अक्षरशः भंबेरी उडाली. सुदैवाने कोणताही अपघात घडला नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://youtube.com/shorts/Kgi2uTyOXvs?si=Ii4dE3_8eIXSNoGU