लांजातील एका वाडीचा आगामी निवडणुकांवर बहिष्कार

लांजातील एका वाडीचा आगामी निवडणुकांवर बहिष्कार

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

ग्रामस्थांचा विरोध डावलूण कोत्रे वाडी येथे जबरदस्तीने ड्रम्पिंग ग्राउंड प्रकल्प लादण्याचा लांजा नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिके विरोधात प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंती आणि आंदोलने करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर या ठिकाणच्या ग्रामस्थांनी आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे

गेल्या 14 ऑक्टोबर रोजी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले लांजा नगर पंचायतीमार्फत  येथे बोगस प्रस्तावाद्वारे वाडी वस्तीजवळ डंपिंग ग्राउंड प्रकल्प लागून जनजीवन उध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला गेला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी या निवेदनात केला आहे या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी लांजा तहसील कार्यालय नगरपंचायत प्रशासन यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करण्यात आली होती मात्र अनेक वेळा या विरोधात आंदोलने उपोषणाचा मार्ग देखील अवलंबण्यात आला होता तरी देखील ग्रामस्थांना न्याय हक्काकडे नगरपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे असे निवेदनात म्हटले आहे

म्हणून आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या ठिकाणी  ग्रामस्थांनी घेतला आहे याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार प्रियांका डोळे यांना सादर करण्यात आले या निवेदनावर 53 ग्रामस्थांच्या सह्या देखील आहेत