उबाठा गटाचे ग्राहक संरक्षण कक्षचे शहर प्रमूख तुषार लांजेकर यांनी ही आज धनुष्यबाण हाती घेतला
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश करताना उबाठा गटाचे ग्राहक संरक्षण कक्षचे शहर प्रमूख तुषार लांजेकर यांनी ही आज धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे.
तुषार लांजेकर हे उबाठा गटाचे ग्राहक संरक्षण कक्षचे शहर प्रमूख असून त्यांच्या येण्याने किरण सामंत यांची ताकद वाढणार आहे. किरण सामंत यांच्या सारख्या नेतृत्वा बरोबर काम करण्यासाठी भाग्य लागत आणि ते भाग्य मला मिळालेले असल्याचे तुषार लांजेकर म्हणाले.
यावेळी राजू कुरूप, तालुका प्रमुख गुरू प्रसाद देसाई, उपतालुका प्रमुख दादा पत्की, लल्या कुरूप, आशिष रेवूनकर यांच्या सहित शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.