प्राण्यांच्या झटापटीत बिबट्या चा मृत्यू ...संगमेश्वरात मृत अवस्थेत घराजवळ सापडला बिबट्या

प्राण्यांच्या झटापटीत बिबट्या चा मृत्यू ...संगमेश्वरात मृत अवस्थेत घराजवळ सापडला बिबट्या
मृत अवस्थेत आढळलेला बिबट्या

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

मौजे- कर्ली , ता. संगमेश्वर , येथील सुधीर चाळके , यांच्या राहते घराच्या उत्तरेला बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याची सुयोग जाधव पोलीस पाटील कर्ली यांनी वनरक्षक दाभोळे यांना भ्रमणध्वनी वरून माहीती दिली त्यानी सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी व वनपाल देवरुख यांना कळविले , त्या नंतर तात्काळ वनरक्षक दाभोळे,साखरपा ,आरवली फुणगुस घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यावेळी बिबट्या मृत अवस्थेत पडलेला दिसला त्यांनतर सदर घटनेची माहिती भ्रमणध्वनी वरून वनक्षेत्रपाल याना कळवली व त्यांनी जागेवर येऊन पाहणी केली असता बिबट्याचे सर्व अवयव सुस्थित असल्याची खात्री केली व पहाणी केली असता , सदर ठिकाणी दोन प्राण्यांच्या झटापटीं झालेचे दिसून आले सदर परिसरामध्ये ठिक ठिकाणी रक्त पडलेचे दिसून आले, त्याचबरोबर बिबट्याच्या डाव्या पायाच्या वरील बाजूस गळ्याच्या खाली ठिकठिकाणी चावा घेतल्याचे व झटापटीच्या खुणा दिसून आल्या त्यानंतर सदर बिबट्यास देवरुख येथे आणून मा. पशुवैद्यकीय अधिकारी, देवरुख यांचे मार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले, असता पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दोन प्राण्याच्या झटापटीमध्ये सदर बिबट्या मृत झालेचे सांगितले मृत बिबट्याचे शवविच्छेदन मा .सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैधकीय सर्वं चिकीसलय युवराज शेट्ये यांनी केले बिबट्या अंदाचे 2.5 वर्षाचा असुन तो नर आहे. सदर बिबट्यास लाकडाची चिता रचून दहन केले , सदरची कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम .प्रियांका लगड , यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार वनपाल तौफिक मुल्ला , वनरक्षक दाभोळे श्री. अरुण माळी , वनरक्षक साखरपा सहयोग कराडे , वनरक्षक फुणगुस , आकाश कडुकर ,वनरक्षक आरवली श्री सुरज तेली यांनी केली तसेच समीर चाळके , श्री संतोष चाळके ,व ग्रामस्थ उपस्थित होते अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरीजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळूण यांनी केली आहे.