लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदार संघाची सध्याची स्थिती

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
लांजा - राजापूर - साखरपा विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार राजन साळवी विरूध्द शिंदे गटाचे युतीचे उमेदवार किरण सामंत याच्यातच मुख्य काटेकी टक्कर होनार असे चित्र असुन या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे राज्य चे लक्ष लागुन राहीले आहे या मतदारसंघातील जनतेला पायाभूत सुविधांचा असलेला अभाव, बेरोजगारीचा प्रश्न, सर्व सुविधा युक्त सुसज्ज रूग्णालय इत्यादी भेडसावणाऱ्या सुविधा निवडकीच्या प्रचारातील मुद्दे प्रकर्षाने प्रभावी ठरणारे असले तरी सध्या ठाकरे शिवसेना विरुध्द शिंदे गट शिवसेना अशी लढाई होणार असुन दोन्हीकडून प्रतिष्ठा पणाला लागली आहे
उमेदवारी जाहीर होण्याआधीपासून आमदार राजन साळवी यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत आहेत. तसेच कीरण सामंत यानी ही आपला प्रचार घराघरात पोहचवला आहे. साळवी आणि सामंत यांचे नातेवाईक ही प्रचारात उतरले असल्याचे दिसुन येत आहे. कीरण सामंत यांनी या मतदारसंघात पंधरा वर्षात कोणता विकास झाला हा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. राजन साळवी यांना सामंत यांनी कडवे आव्हान दीले आहे. तसेच या मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये फुट पडली आहे. कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे थोडा फार फटका आघाडीचे उमेदवार यांना बसण्याची शक्यता आहे. दोन्ही स्ट्रॉन्ग उमेदवार असल्याने सध्या दोघांचेही पारडे जड असल्याने शेवटी बाजी कोणाची? हे जनता च ठरवणार आहे.