कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा वेग झाला कमी
कोकण रेल्वेवर मान्सून वेळापत्रक लागू झाले असून 10 जूनपासून कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. हे बदललेले मान्सूनचे वेळापत्रक 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे.
तसेच यंदा प्रथमच या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर पहिलाच पावसाळा असल्याने कोकण रेल्वेने त्या दृष्टीने तयार पूर्ण केली असून अतिवृष्टी झाल्यानंतर लोको पायलटसमोरची दृश्यमानता घटल्यास ट्रेन प्रतितास 40 कि.मी. वेगाने गाडय़ा चालविण्याचे आदेश कोकण रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
रोहा ते ठोकूर असा कोकण रेल्वेचा 740 कि.मी.चा मार्गावर पावसाळय़ापूर्वीची बोल्डर हटविणे, झाडांच्या फांद्या छाटणे, झरे साफ करणे अशी कामे पूर्ण झाली आहेत. दर एक किलोमीटरमागे तब्बल रेल्वेचा स्टाफ निगराणी करणार असून तब्बल 846 पेट्रोलमन आणि संवेदनशील जागी 24 तास पहारा करणारे ‘स्टेशनरी वॉचमन’ नियुक्त करण्यात आली आहे. लोको पायलट आणि गार्डकडे संपर्कासाठी वॉकीटॉकी यंत्रणा पुरविण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन स्थितीत ट्रेन क्रूशी संपर्क साधण्यासाठी स्टेशनमास्तरांकडे 25 वॅटवर चालणारे विशेष वायरलेस नेटवर्कची ‘व्हीएचएफ’ यंत्रणा पुरविण्यात आली आहे.
Bni salah transfer