कोल्हा पडला विहिरीत .. वन विभागाने दिले त्याला जीवदान

कोल्हा पडला विहिरीत .. वन विभागाने दिले त्याला जीवदान
सोनेरी दिसणारा हा कोल्हा विहिरितून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे ..सौजन्य पुढारी

 मालवण तालुक्यातील धामापूर-पेठवाडी येथे एका खोल विहिरीत एक सोनेरी कोल्हा पडला. कुडाळ वनविभागाच्या रेस्कू पथकाने सुखरूप बाहेर काढत त्याला जीवदान दिले आहे

ही घटना रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.
रविवारी दुपारी दिनेश काळसेकर यांच्या विहिरीमध्ये कोल्हा पडला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. काळसेकर यांच्या घरालगत असलेल्या सुशीलकुमार घाडी यांनी ही माहिती दिली. कुडाळ वनपरिक्षेत्राच्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 15 ते 20 फूट खोल विहिरीत पडलेल्या त्या कोल्ह्यास सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पाण्याची पातळी सुमारे 4 ते 5 फूट असलेल्या या विहिरीत कोल्ह्याने बिळ केल्याने, तो पाण्याबाहेर येताच त्या बिळामध्ये जात असे. त्यामुळे या बचाव कार्यात अडचण येत होती. अखेर अथक प्रयत्नाने त्यास पिंजऱ्यात घेण्यात बचाव पथकास यश आले.