लांजा मध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या बँक ऑफ इंडियाच्या सीसी खात्यातील ९२ लाख ५० हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा
Kokan Live Digital News:
लांजा शहरातील यश कन्स्ट्रक्शन कंपनी या बांधकाम व्यावसायिकाच्या बँक ऑफ इंडियाच्या सीसी खात्यातील ९२ लाख ५० हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली आहे.तालुक्यातील आजवरचा हा सर्वात मोठा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजीही घटना घडली आहे. यश कन्स्ट्रक्शन कंपनी आपले सर्व व्यवहार बँक ऑफ इंडिया शाखा लांजा मध्ये करत असत. त्यांना ऑनलाईन व्यवहार हाताळणीसाठी बँकेने देखील त्यांना ॲप वापरण्यास दिले होते. अशाच वेळी ४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये जमा असलेले ९२ लाख ५० हजार रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन ट्रांजेक्शन करून ही रक्कम लांबविली आहे.
विशेष म्हणजे सदरचे बँक खाते यश कन्स्ट्रक्शनचे पार्टनर सुधीर भिंगार्डे यांच्या मोबाईल नंबरशी कनेक्ट होते. मात्र सदरचा मोबाईल ही घटना घडण्या अगोदर एक दिवस पूर्णपणे बंद पडला होता. त्यानंतर तो दोन दिवसांनी त्यांनी चालू केल्यानंतर ऑनलाइन ट्रांजेक्शनने पैसे काढण्यात आले असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. आपल्या खात्यातून इतकी मोठी रक्कम ऑनलाईन ट्रांजेक्शन करून लांबविल्याच्या घटनेने सुधीर भिंगार्डे हादरुन गेले आहेत.
याबाबत सुधीर सिताराम भिंगार्डे यांनी लांजा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून अज्ञात भामट्या विरोधात लांजा पोलिसांनी भादवि कलम ४२० व माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Bni salah transfer