कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका रेल्वे गाडीच्या इंजिनात बिघाड काही काळासाठी सेवा ठप्प

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका रेल्वे गाडीच्या इंजिनात बिघाड काही काळासाठी सेवा ठप्प
संग्रहित चित्र

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेची वाहतूक ही ठप्प झाली आहे. कोकण रेल्वे मार्गवर धावणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये काहीसा बिघाड झाला आहे. आज सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला आहे. यामुळे कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उशीर होण्याचं त्रासाचा सामना करावा लागणार आहे. मुंबईहून निघालेल्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) शनिवारी रात्री निघाली कोकण कन्या गोव्यापासून जवळपास २५० किलोमीटर अंतरावर बंद पडली होती.
कोकण कन्या एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुटली होती. पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास रत्नागिरी सोडल्यावर विलवडे रेल्वे स्थानकाच्या दिशेने कोकण कन्याचा प्रवास सुरु होते. मात्र, यावेळी गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकातच कोकण कन्या २ तासांपासून थांबून आहे. मुंबईहून रात्री निघालेली कोकण कन्या एक्स्प्रेस गोव्यामधील मडगाव रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४५ वाजेच्या सुमारास पोहोचते. मात्र, २ तासांपासून रखडलेली ही गाडी आता कधी पोहोचणार, हे अद्याप अस्पष्ट आह.