मुंबई-गोवा महामार्गावरील टोल नाके एक जून पासून होणार सुरू
१ जून पासून मुंबई -गोवा महामार्गावर ओसरगाव आणि हातीवले येथे होणार टोलवसुली
*कणकवली*- टोल वसुलीच्या मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला असला तरी १ जून पासून कणकवली येथील ओसरगाव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग हद्दीलगतचा हातीवले टोल नाक्यावरून टोल वसुली सुरू होणार आहे. त्याबाबतची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे टोलच्या मुद्दयावर पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Bni salah transfer