लांजातील सय्यद चाँदशाह बुखारी बाबांचा उरूस मुबारक भक्तिमय वातावरणात व शासनाच्या नियमानुसार होणार संपन्न
हजरत पिर सय्यद चाँदशाह बुखारी बाबा लांजा यांचा उर्स मुबारक 15 फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे
यावर्षी करोनाचे सावट गडद असल्याने सर्व शासनाचे नियम पाळून हा उर्स मुबारक पार पडणार आहे
13 तारखेला चुना कार्यक्रम असणार आहे तर 14 फेब्रुवारी ला संदल व मुकुट अर्पण कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तसेच संदल मिरवणूक सोमवारी सायंकाळी ठेवण्यात आली आहे
मात्र या मिरवणुकीत मोजकेच लोक सोशल डिस्टंसिंग व मास्क परिधान करून कार्यक्रम करतील असे देखील दरगाह कमिटी तर्फे ठरवण्यात आले आहे
तसेच 15 फेब्रुवारी मंगळवारी पुर्ण दिवस उर्स मुबारक संपन्न होईल त्यामध्ये रात्री रातिब कार्यक्रम ठेवण्यात आला असून या कार्यक्रमालाही भाविकांनी मोठी गर्दी न करता शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टंसिंग ठेवून कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन दर्गा कमिटी व शासनातर्फे करण्यात आले आहे
तरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजरत पिर सय्यद चाँदशाह बुखारी बाबा लांजा यांचा उर्स मुबारक संपन्न होणार असल्याने भाविकांनी याची नोंद घ्यावी असेदेखील आवाहन करण्यात आले आहे
Bni salah transfer