लांजा च्या वेल्फेअर सोसायटी मार्फत आजपर्यंत हजारो लोकांना मदत
Kokan Live Digital News:
सर्वधर्म समभाव समजली जाणारी मुस्लिम वेलफेर सोसायटी यांच्या तृतीय वर्धापन दिन 14 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी, लांजा, व परदेशातील ओमान, तसेच दुबई येथे पार पडला या वेळी वेलफेयर सोसायटी च्या पधाधिकाऱ्यांनी लांजा येथील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकं, पाटी, पेन्सिल, यांचे वाटप करण्यात आले तसेच काही पेशन्ट ना आर्थिक सहाय्य करून त्यांची सेवा करण्यात आली तसेच ओमान सलाला आणि दुबई येथे अडकलेल्या आणि लाचार व्यक्तींना तिकीट काढून त्यांना मायदेशी रवाना करण्यात आले तसेच काहीना रुग्णालयात जाऊन आर्थिक सहाय्य करून सोडवण्यात आले
मुस्लिम वेलफेयर ही कोरोना काळ तसेच चिपळूण महाड या ठिकाणी कार्यामध्ये अग्रेसर होती अंत्यविधी, दफनविधी,रुग्णांना आर्थिक सहाय्य, ग्राम दत्तक योजना, खेळाला प्राधान्य, गरजू लोकांना अन्न धान्य, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, महिला शशक्तिकरण, वृद्ध योजना,परदेशीं जाण्याऱ्या व्यक्तींना लसीकरण कॅम्प राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण, शिक्षनाला प्रधान्य म्हणून मदरसा स्थापना, यामध्ये अग्रेसर असणारी मुस्लिम वेलफेयर सोसायटी आहे
त्या मुळे कोकणाबरोबर परदेशात ही ओलखली जाते
. मुस्लिम वेल्फर चे अध्यक्ष रफिक शेठ नाईक, कार्याध्यक्ष अकील नाईक, सचिव राजू नाईक, खजिनदार सईद खान , सल्लागार ताजू मुजावर,रत्नागिरी अध्यक्ष सोहेल मुकादम,अबुधाबी अध्यक्ष अन्वर कासु, दुबई अध्यक्ष काबील गांगु, तदफिन हेड अब्दुल रहमान सहिबोले, ओमान अध्यक्ष नासिर टोले सलाला अध्यक्ष सलीम धामस्कर, मस्कत अध्यक्ष मुबारक राखंगी, बाकी सदस्य दिलावर सारंग,रियाज कलोत, नाजीम रामदूल, नाझिर शेख, बबन लांजेकर, मुश्ताक राऊत, वाडेकर ब्रदर, माजीद आरिफ घारे आयेशा बागवान दिलशाद नाईक वसिम मुजावर समीर मुजावर आदिनी मेहनत घेऊन गरीब आणि लाचार लोकांना मदत पोहचाण्याचे काम केले आहे
मुस्लिम वेल्फेयर लांजा चा* तिसऱ्या वर्धापन दिना निमित्त आज 14 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद ऊर्दू शाळा, लांजा व जिल्हा परिषद बागेश्री शाळा, लांजा या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आदम मापारी सर, खोडील जनाब, आरिफ घारे, दिलशाद नाईक इत्यादी उपस्थित होते
Bni salah transfer