मनसे चा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा.

मनसे चा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा.

महा मार्गाची  अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी ही दुरावस्था अशीच राहिली तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

रविवारी धामणी परिसरातील एका खड्यात दिवसभरात आठ दुचाकीस्वार पडून अपघात झाले. यामध्ये अनेक दुचाकीचालक जखमी झाले तर वाहनाचेही नुकसान झाले आहे. याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संगमेश्वर तालुका संपर्कअध्यक्ष श्रीपत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती एक अनोखे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संबंधित ठेकेदाराचा प्रतिकात्मक पुतळा बनविण्यात आला. व त्यावर मी मुंबई गोवा महामार्गाचा कामचोर व ना....लायक ठेकेदार आहे, वाहने सावकाश हाका असा फलक लावण्यात आला होता .या पुतळ्याचे अनावरण करून महामार्गावर पडलेले खड्डे जेसीबीच्या सहाय्याने मनसे कार्यकर्त्यानी भरले.याकामी उद्योजक संदीप मयेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.