एस टी च्या संपात मनसे सामिल

एस टी च्या संपात मनसे सामिल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील  महाराष्ट्रसैनिक एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होत आहेत. आज रत्नागिरीतही मनसे पदाधिकाऱ्यांनी माळनाका येथील राज्य परिवहन मंडळ विभागीय कार्यालय येथे आंदोलनाच्या ठिकाणी राज्य  परिवहन मंडळाच्या कामगारांची   प्रत्यक्ष भेट घेत व सहभागी होत  कामगारांच्या न्याय्य मागण्यांना, विशेषतः *'राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे'* या मागणीला पक्षातर्फे जाहीर पाठिंबा दिला व आंदोलन तडीस जाईपर्यंत सोबत असू अशी ग्वाही देण्यात आली .

तसेच या पाठिंब्यासंदर्भात राज्य परिवहन मंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक यांची भेट घेत शासनाकडून होत असलेल्या निलंबनाच्या कारवाई चा  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निषेध व्यक्त करत ही कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी  व कामगारांच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करत त्यांच्या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला .

याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत , मनसे कामगार सेना जिल्हा चिटणीस छोटू खामकर , शहर अध्यक्ष सतिश राणे , उपतालुकाध्यक्ष राजू पाचकुडे, उपशहरअध्यक्ष अमोल श्रीनाथ ,उपशहरअध्यक्ष मयुरेश मडके , विभागअध्यक्ष सर्वेश जाधव , 
विभागअध्यक्ष अक्षय माईन , विभागअध्यक्ष अजिंक्य केसरकर , 
विभागअध्यक्ष शैलेश मुकादम , शाखाध्यक्ष नैनेश कामेरकर , शाखाध्यक्ष राहुल खेडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.