उद्योजक अण्णा सामंत यांच्याहस्ते कोंडये ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

उद्योजक अण्णा सामंत यांच्याहस्ते कोंडये ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

 

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कोंडये ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. सदर ग्रामपंचायत इमारत कामासाठी ना. उदय सामंत यांनी जिल्हा वार्षिक योजनेमधून विशेष असा 20 लक्ष निधी मंजूर करून दिल्यामुळे कोंडये ग्रामस्थांची ग्रामपंचायत लवकरच नवीन वास्तूमध्ये कामकाज सुरू करेल* या नवीन वास्तूमध्ये सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय,ग्रामीण पोस्ट या सुविधा या करिता नियोजन करण्यात आले आहे, दुर्गम भागात वसलेल्या या गावामध्ये ग्रामपंचायतीची अतिशय देखणी वास्तू लवकरच उभी राहणार असल्यामुळे आजच्या कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले  आहे.

     या भूमिपूजन सोहळ्याला जि प सदस्य रचना महाडिक,पंचायत समिती उपसभापती परशुराम वेल्ये, सरपंच आणि शिवसेना खाडी विभागप्रमुख  सरपंच आणि विद्यमान सदस्य सुरेश दसम आदी मान्यवर उपस्थित होते