किरीट सोमय्या हातोडा घेऊन निघाले दापोलीला
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा दापोलीतील मुरुडमध्ये असणाऱ्या रिसॉर्टचा विषय पुन्हा चर्चेत आलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज आपण अनिल परबांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं होतं.त्यानंतर आज सोमय्या सव्वा सात वाजेच्या सुमारास मुंबईतील आपल्या घरापासून दापोलीला निघाले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांची गर्दी होती. सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यात अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते त्यांचं स्वागत करत त्यांच्या या दौऱ्यात सामील होणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज या विषयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.दापोलीकडे निघाल्यानंतर सोमय्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजप नेते उद्धव ठाकरे म्हणतात अनधिकृत बांधकाम करणार, हे काय मुख्यमंत्री आहेत? असा सवाल करत त्यांनी जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार असं म्हटलं. तसंच आपल्या हातातील हा हातोडा साडे बारा कोटी जनतेचा हातोडा आहे, जनतेचा हा हातोडा आहे सत्यासाठी हा आग्रह आहे, हे अनधिकृत बांधकामं तोडावं लागणार आहे असं सोमय्या म्हणाले
Bni salah transfer