कोकणातील शेतकऱ्यांच्या बागेत तब्बल 19 किलो वजनाचा भोपळा
Kokan Live Digital News:
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक एक म्हातारी भोपळ्यात बसून जात असते अशी गोष्ट आपण बाळ पणात ऐकली होती तशाच प्रकारचा हा भोपळा राजापूर मध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात पिकला आहे तब्बल 19 किलो वजनाचा हा भोपळा आहे
तांबडा भोपळा याचे वनस्पतीशास्त्रीय नाव Cucurbita maxima; कुळ:Cucurbitaceae इंग्लिश:Pumpkin(पमकिन) हिंदी: (कद्दू ) हा वेलवर्गातील असून याची भाजी वा भरीत करतात किंवा घारगे नावाचा गोड पदार्थही करतात. भोपळ्याची खीर , पराठे, इत्यादी पदार्थही करता येतात. भोपळा आरोग्यासाठी खूप महत्त्वांचा आहे.
राजापूर दोनीवडे येथील अभ्यासू बागायतदार प्रवीण तोरसकर यांच्या हातीवले येथील आंबा काजू बागायती बरोबरच आंतरपीक घेत काकडी, चिबुड दुधी, तांबडा भोपळा यांची लागवड करून विक्रमी पीक घेतलं आहे. त्यांच्याच या बागायतीत महाकाय असा तब्बल 19 किलो वजनी भोपळा उत्पादित झाला आहे
या उत्पादनासाठी त्यांनी सेंद्रिय खताचा वापर केल्याचे त्यांनी सांगितलं. हवामानातील बदलाचा परिणाम आंबा,काजू या उत्पादनावर होताना दिसून येतोय. फक्त या उत्पादनांवरच औलांबून न रहाता आंतर पिकातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते हे आज त्यांनी दाखवून दिले आहे
Bni salah transfer