तब्बल आठ हजार 540 किलोमीटर पायी प्रवास करून हज यात्रा करणारा अवलियाचे लांज्यात जंगी स्वागत

तब्बल आठ हजार 540 किलोमीटर पायी प्रवास करून हज यात्रा करणारा अवलियाचे लांज्यात जंगी स्वागत
लांजा जमातुल मुस्लिमीन संघातर्फे त्यांचे स्वागत करताना दिसत आहे

Kokan Live Digital News:

रुबिन मुजावर रिपोर्ट.....

देवावर एक सच्ची भक्ती कशी असते याचे उदाहरण म्हणजेच केरळ येथून सौदी अरबिया ला तब्बल नऊ हजार किलोमीटर पार करून चालत जात असलेला हा अवलिया ज्याचे नाव आहे मोहम्मद शहाबुद्दिन छोटूर वय 30  गेल्या सात वर्षापासून हा अवलिया केंद्र सरकार व स्थानिक पातळीवर हज ला जाण्यासाठी, प्रवास परवानग्यांसाठी प्रयत्न करत होता त्याच अनुषंगाने त्याने असा विचार केला होता की हाज यात्रेला सर्व विमानाने किंवा जहाजाने जातात मात्र मी स्वतः पायी चालत जाऊन हज यात्रा करणार

त्यामुळे तो केरळ ते सौदी अरेबिया आठ हजार 540 किलोमीटर पायी प्रवास करत आहे गेल्या पंचवीस दिवसापूर्वी तो केरळ येथून निघाला आहे त्या मधे त्याने 940 किलोमीटर प्रवास करून आज त्याचे रत्नागिरी जिल्ह्यात पदार्पण झाला आहे त्यामुळे सर्व तालुक्यातून त्याचं मुस्लिम समाजतर्फे कौतुक केले जात आहे व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत जेणेकरून त्याच्या या भक्तिमय प्रवासात लोकांचाही हातभार लागावा त्यामुळे जागोजागी त्याचे पुष्पगुच्छ व नारे देत स्वागत केले जात आहे

लांजा मध्ये झालं जंगी स्वागत लांजा जमातुल मुस्लिमीन संघातर्फे लांजा च्या सीमेवर त्याचे स्वागत करण्यात आले त्यानंतर लांजा चा नशा बुखारी दर्गा याठिकाणी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी त्यांनी काही काळ विश्रांती देखील घेतली आहे त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले आहेत
 21व्या शतकात जग चंद्र आणि मंगळावर जाऊन पोचले त्या ठिकाणी हा अवलिया 8640 किलोमीटर पायी प्रवास करणार आहे कोणतेही वाहन न वापरता त्यामध्ये तो प्रथम भारत, पाकिस्तान ,इराण, कुवेत व सौदी अरेबिया अशा देशांना भेट देत तो मक्का मदिना ला पोहोचणार आहे त्याच्या ह्या जब्याला सर्व सर्व धर्मीयांमध्ये ऊन सलाम केला जात आहे


  त्यांच्याबरोबर सात ते आठ लोकांची टीम असून ती टीम त्यांना भारतीय सिमे रेषेपर्यंत पोहोचवणार आहे त्यानंतर ते पुढील प्रवास दुसऱ्या देशातून करणार आहेत त्यासाठी त्यांच्याकडे पासपोर्ट विजा व सर्वसंमत्या त्यादेखील प्राप्त आहेत असे त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी सांगितले