रत्नागिरी मिरजोळे येथे गावठी दारू भटयांवर पोलिसांची कारवाई
काल बुधवारी पुन्हा एकदा पोलिसांनी मिरजोळे येथे धाड टाकून गावठी दारूचा अड्डा उध्वस्त केला आहे या गावठी दारू भट्टयाँबाबत ग्रामीण पोलीसाना गुप्त माहिती मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवार सकाळी ०७.०० वा. पोलिसांनी मिरजोळे येथे अवैध दारु धंदयावर धाड टाकली. या कारवाईमध्ये 3600 लिटर गुळ – नवसागर मिश्रीत रसायन व इतर साहित्य 72,000/- रुपये तसेच 48 लिटर गावठी हातभट्टीची दारु व दारु गाळण्याचे साहित्य व तीन मोटार सायकल असा एकूण 87650/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
हया प्रकरणात तीन जणांच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश रेड्डी यांचेसह, सपोनि श्री. शेळके, पोना/पावसकर, पोहवा/कदम, पोहवा/गायकवाड, पोहवा/वाझे, पोकॉ/शिंदे व पोकॉ/कांबळे यांनी केली.
Bni salah transfer