आज जागतिक पर्यावरण दिन मात्र रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड वृक्षतोड
आज जागतिक पर्यावरण दिन आहे मात्र आमच्याकडे आलेली काही चित्र दर्शवत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात जंगल तोड सुरू आहे याला जबाबदार कोण हाच प्रश्न सर्वांना आहे
कारण ज्यावेळी आंबा घाटातून मोठ्या प्रमाणात लाकडे भरलेली ट्रक जाताना दिसतात तेव्हा एकच विचार पडतो की ही सर्व जंगल तोड कुठे व कशी होते व त्याबाबत परवानग्या या लोकांना कशा मिळतात अशीच परिस्थिती राहिली तर एक वेळ अशी येईल रत्नागिरी जिल्ह्यात झाडे कमी आणि बोकड डोंगर पाहायला मिळतील
जागतिक लेव्हल ची माहिती घेतली तरआज पृथ्वीची अवस्था वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. झाडे जंगले कमी झाली. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे ६० % भाग वनांनी व्यापलेला होता, सध्या पृथ्वीचा केवळ २१ % भागातच वने आहेत. निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे मोडली तर दुरूस्त करणेही जमण्यासारखे नाही. म्हणून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वृक्षतोडीमुळे एक दिवस ही पृथ्वी रसातळाला जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. आज जंगलतोडीचे दुष्परिणाम निर्माण झाले आहेत. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधात आहेत. त्यामुळे आज अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत
Bni salah transfer