फेरफार अदालतीचा नागरीकांनी लाभ घ्यावा --- अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे
रुबिन मुजावर
(कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज)
महाराष्ट्र शासनाच्या “महाराजस्व अभियान” अंतर्गत *दर महिन्याच्या दुसर्या बुधवारी* तालुक्यातील मंडळ स्तरावर नायब तहसीलदार व मंडळअधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली *“फेरफार अदालत”* आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर जे फेरफार विनातक्रारी आहेत आणि ज्या फेरफाराची नोटीस बजावणी होऊन 15 दिवस पुर्ण झालेले आहेत व कोणतीही हरकत प्राप्त नाही असे फेरफार हे या फेरफार अदालतीमध्ये निर्णीत करण्यात आल्या
इंटरव्यू पाहण्यासाठी क्लिक करा
8 जुन 2022 मधील फेरफार अदालत मध्ये लांजा ,खरवसे,तळवडे, वेरवली बुद्रुक वाडगाव व वेरवली खुर्द ठिकाणी फेरफार अदालत आयोजित करण्यात आलेले आहेत. यावेळी विनातक्रारी व मुदत संपलेले फेरफार निर्णीत करण्यात आले.
तरी तलाठी, मंडळ स्तरावर फेरफार प्रलंबित असणार्या नागरीकांनी आपल्या मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सदर दिवशी उपस्थित राहावे आणि आपला फेरफार निर्णीत करुन घ्यावा.आणि सदर निर्णीत फेरफाराचा तात्काळ 7/12 सदरी अंमल केला जात असल्याने नागरीकांना तात्काळ अद्ययावत 7/12 सुध्दा याच ठिकाणी मिळू शकतो असे तहसीलदार प्रमोद कदम यांनी सांगितले.
तरी जास्तीत जास्त नागरीकांनी सदर फेरफार अदालतीस उपस्थित राहुन आपले प्रलंबित असलेले फेरफार निर्णीत करुन घ्यावेत असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलेले आहे.
याठिकाणी उपस्थित असलेले नायब तहसीलदार यांच्याकडे आपल्या फेरफारांबाबत काही तक्रारी असल्यास नागरीकांनी मांडाव्यात असे आवाहन श्री जाधव यांनी तालुक्यातील नागरीकांना केलेले आहे.
Bni salah transfer